जाणून घ्या, शुद्ध पाण्याचे महत्त्व (भाग 2)

नळाद्वारे पाणी पुरवठा असेल तर पाईप लाईन कुठे फुटलेली आहे किंवा नादुरुस्त झाली आहे ते पाहून लगेच दुरुस्त करून घेतली पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये घाण मिसळणार नाही. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सृष्टीतला एकही जीव, वनस्पती जिवंत राहू शकत नाही. सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाहीत. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे कारखाने नाहीत. पाणी इतके अमुल्य असतांना आपल्याला पाण्याचे महत्त्व अद्याप का समजत नाही?

डॉ. सचिन जाधव

शुद्ध पाण्याची आवश्‍यकता का?
जसं अन्न ताजं खावं, असं आपण म्हणतो, तसंच पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी पाणी हे नेहमी शुद्ध केलेलंच असावं. जर अशुद्ध पाणी वापरल तर त्यामुळे अनेक आजार होतात. हे आजर होऊ नयेत म्हणून पाणी शुद्ब करणे आवश्‍यक आहे. शुद्ध पाणी म्हणजे केवळ स्वच्छ पाणी नव्हे तर जंतूविरहीत किंवा निर्जंतुक केलेले पाणी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

पाणी दूषित होण्याची कारणे

विहिरीवर भांडी घासणे
जनावरे धुणे
लहान मुलांना शौचाला बसवणे
कपडे धुणे
सर्व आजूबाजूला दलदल असणे याच पाण्याचा वापर पिण्याकरिता करणे.

जाणून घ्या, शुद्ध पाण्याचे महत्त्व (भाग 1)

टॅंकरद्वारे पाणी दूषित होण्याची कारणे

ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. अशा गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अस्वच्छ पाणी जिथून उपलब्ध असेल तेथून भरून तो टॅकर गावात उभा केला जातो. अथवा विहिरीत, सोडला जातो. पाणी टंचाई असल्यामुळे लोक मिळेल ते पाणी घेऊन वापरतात. अतिशय अशुद्ध पाणी सुद्धा नाईलाजाने वापरावे लागते.

नळाद्वारे पाणी दूषित होण्याची कारणे

खासगी पाईपलाईनमध्ये गळती असणे.
नळ जोडणी खराब असणे.
गटारातून पाईपलाईन जाणे.
घरातील मोरीतून पाईपलाईन जाणे.
नळाला तोट्या नसणे. नळाभोवती खड्डे असणे.
घरातील पाणी दूषित होण्याची कारणे
पाण्याची भांडी उंचावर न ठेवल्यामुळे लहान मुले त्यामध्ये हात घालतात.
पिण्याचे पाणी घेण्यासाठी वगराळे न वापरणे.
पाणी झाकून न ठेवणे.
खड्डा करून त्यात रांजण ठेवणे त्यात पिण्याचे पाणी साठविणे. या रांजणाला बाहेरून शेवाळे येते व पाण्यातला घाण वास येतो व ते पाणी दूषित होते.
शौचाहून आल्यावर हात साबणाने न धुणे.

पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती

पाणी नेहमी गाळून घ्या व उंचावर ठेवा, झाकून ठेवावे.
पिण्याच्या पाण्यात शेवग्याच्या शेंगाच्या वाळलेल्या बिया टाकून ठेवल्या तर गाळ त्यात चिकटतो व खाली तळाशी बसतो.
पाणी उकळून घ्यावे.
पाण्यावर तुरटी फिरवावी आणि गाळ बसण्यासाठी ठेवावे म्हणजे थोड्यावेळाने पाणी पिण्यास शुद्ध होते
पाणी घेण्यासाठी वगराळे वापरावे.

पाणी अशुद्ध कसे होते..

पाण्यात रोगजंतू किंवा विषारी रसायने मिसळणे म्हणजे पाणी अशुद्ध होणे. हे रोगजंतू मुख्यतः माणसाच्या व इतर प्राण्यांच्या विष्ठेमार्फत येतात. नदी, झरे, तलाव या पृष्ठभागावरच्या पाण्यात रोगजंतूंचे प्रमाण जास्त असते. कारण जमिनीवरच्या घाणीचा संबंध त्या पाण्याशी लवकर व सहज येतो. नद्यांमध्ये तर वरच्या गावाचे मैलापाणी सर्रास सोडले जाते. त्यामुळे रोगजंतूंबरोबर विषारी पदार्थही मिसळतात. तसेच तलाव-विहिरीत कपडे, भांडी धुणे, आंघोळ करणे, गुरे बसवणे यामुळे रोगजंतू मिसळतात. पाण्याचा मोठा साठा किंवा प्रवाह असेल तर थोड्याशा घाण पाण्याचा फारसा परिणाम होत नाही. पण घाण पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर मात्र दुष्परिणाम दिसतात. या सर्व कारणांमुळे पृष्ठभागावरचे पाणी (नदी, झरे, तलाव, इत्यादी) शुध्द केल्याशिवाय वापरणे धोक्‍याचे असते. उत्तर भारतातल्या गंगा-यमुनेसारख्या मोठ्या नद्यांचे पाणीही आता सरळ पिण्यास योग्य राहिलेले नाही.

महाराष्ट्रात सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत. जमिनीखालचे आणि खडकाखालचे झरे (विहीर, बोअरवेल) मात्र सहसा दूषित होत नाहीत. खडकाच्या खालपासून पाणी उपसणा-या बोअरवेलचे पाणी सरळ पिण्याजोगे शुध्द असते. उघडया विहिरीमध्ये दूषित पाणी किंवा घाण मिसळून पाणी खराब होण्याची शक्‍यता असते. मात्र या विहिरी आतून बांधून, खट्टा करून झाकल्या व आत उतरायला बंदी केली तर पाणी शुद्ध राहते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)