जाणून घ्या ‘शरपुंखी’चे उपयोग

शरपुंखी किंवा उन्हाळी हे दोन फूट उंच व पुष्कळ फांद्या असलेले एक झुडुप आहे. हे खडकाळ जमिनीत उगवते. हे सहसा लगेच उपटता येत नाही. याची पाने लहान असतात व किंचित लांबट असतात.याला फुले लाल रंगाची येतात.फळे म्हणजे शेंगा चपट्या असतात. त्यात चार ते सहा गोल दाणे असतात. याचे सुकविलेले झाड बाजारात विकत मिळते. शरपुंखी किंवा उन्हाळी ही एक खडकाळ पठारावर आढळणारी औषधी वनस्पती आहे.

कुष्ठरोगावर – शरपुंखीच्या पानांची गोळी करून सकाळ संध्याकाळ घेतली असता कुष्ठरोग बरा होतो.

व्रणावर – वाटलेली शरपुंखीची पाने जर औषध म्हणून व्रणास बाहेरून मधातून लावली असता व्रण बरा होण्यास मदत होते.

चिवट व जुनाट खरजेवर – कोणत्याही चिवट व जुनाट खरजेवर शरपुंखीच्या शेंगातील बियांचे तेल लावावे. या बियांपासून तेल काढतात, जे तात्काळ खरूज बरी करते.

गंडमाळेवर – उन्हाळीच्या किंवा शरपुंखीच्या झाडाचे मूळ उगाळून पोटात घ्यावे तसेच गंडमाळेवर वरून मूळ उगाळलेला लेप लावावा.गंडमाळ पूर्ण बरी होते.

रक्तीमूळव्याधीवर – उन्हाळीच्या पानांचा व मुळाचा उपयोग रक्तीमूळव्याधीवर होतो. शरपुंखीची मुळी दह्यात उगाळून, पोटात एक छोटा चमचा घ्यावी. तसेचमूळव्याधीत मोड फुटला असल्यास त्याला लावावी, ताबडतोब मूळव्याधीचे रक्त थांबते.

दम्यावर – उन्हाळीच्या मुळ्यांचा धूर तोंडात घेतल्याने दमा कमी होतो.

प्लीहोदर व यकृताच्या विकारावर – शरपुंखीच्या मुळ्या ताकात उगाळून प्यायल्याने प्लीहोदर व यकृताचे विकार बरे होतात.

अंडवृद्धीचा विकार – शरपुंखीची मुळी उगाळून लावल्याने व एक चमचा पोटात घेतल्याने अंडवृद्धीचा विकार बरा होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)