जाणून घ्या…निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यावर वाचकांची मतं 

पुणे: आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे, ही विरोधी पक्षांची मागणी योग्य आहे का ? या संदर्भात ‘दैनिक प्रभात’ने वेबसाईट व फेसबुकच्या माध्यमातून वाचकांचे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वेबसाईटवर 67 % वाचकांनी ही मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे तर 33% वाचकांनी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
तसेच दैनिक प्रभातच्या फेसबुक पेजवर ८२ % वाचकांनी  बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे, ही मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे तर फक्त १८ % वाचकांनी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
इव्हीएमबद्दल निर्माण झालेल्या अविश्‍वासामुळे 2019 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या मशीन्सऐवजी बॅलेट पेपरच वापरावे , अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे प्रमुख राजकीय पक्षांना मतदानासाठी व्हीव्हीपीएटी मशिनशिवाय ईव्हीएम वापरल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे.
दैनिक प्रभातने राभवलेल्या उपक्रमात आपण वाचकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल ‘दैनिक प्रभात’ आपले आभारी आहे. तसेच आम्ही सतत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 
धन्यवाद !
  • आमचं फेसबुक पेज लाईक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
  • व्हिडियो अपडेट साठी आमचे You Tube चॅनेल subscribe करा 
  • ताज्या बातम्यांसाठी डाउनलोड करा दैनीक प्रभातचे अँप 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)