जाणून घ्या चांगल्या झोपेचे पाच फायदे… 

वजन नियंत्रणात राहण्यास मदत 
चांगल्या झोपेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि दिसणारा फायदा म्हणजे तुमचे वजन एकदम आटोक्‍यात राहाते. होय! तुमच्या झोपेच्या पद्धतीत काही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम वजन वाढण्यात होतो. कारण? उत्तम झोप तुमच्या शरीराला आराम देते, तसेच लॅप्टिन संप्रेरकाची पातळीही योग्य प्रमाणात राखते. हे योग्य पातळीतील संप्रेरक अनावश्‍यक भूकेला आळा घालते आणि तुमच्या शरीरातील ऊर्जेचे प्रमाण राखते. संप्रेरकाची पातळी घसरल्याने तुमच्या शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते, यामुळेच तुमचे अन्नसेवनाचे प्रमाणही वाढते.

दुखणे निभावणे सोपे जाते 
तुम्हाला अलीकडे कुठली जखम झाली असेल किंवा तीव्र वेदना झाली असेल, तर योग्य झोप मिळणे अत्यावश्‍यक आहे. खरं तर, तुमच्या त्रासासाठी झोप हाच उत्तम उपाय असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. पण यामागचे कारण काय आहे? शरीराला जखम झाल्यावर किंवा सांधेदुखीसारखे गंभीर आजार झाल्यास दाहक प्रथिने सोडतात. ही शरीराची नैसर्गिक उर्मी आहे. झोपेचा अभाव असेल, तर शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अधिकाधिक दाहक प्रथिने सोडली जातात. यामुळेच स्वस्थ झोपा; तुमच्या लक्षात येईल की, तुमचं दुखणं कसं पळून जातंय ते.

नैसर्गिक उर्मी चांगल्या राहतात 
झोपेच्या अभावामुळे पुरुषांमधील टेस्टोटेरॉन स्तराचे प्रमाण कमी होते. यामुळे उत्तेजनेसंबंधी अडचणी निर्माण होतात. महिलांमध्येही लैंगिक गरजांमध्ये घट होत असते. एकूणात योग्य झोप मिळणे, हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कारणासाठी तरी गरजेचे आहे.

ऍलर्जींशी लढण्यासाठी मदत करते 
झोप उडवण्यासाठी ऍलर्जीसारखा दुसरा घटक नाही. धुळीतले सहज दिसून न येणारे छोटे कण तुमच्या नैसर्गिकरीत्या गळून पडलेल्या मृत त्वचेवर जगतात व ते ऍलर्जीचे प्रमुख कारण असतात. बहुतेक चांगले ब्रॅंड्‌स त्यांच्या उत्पादनांमध्ये ऍलर्जी संरक्षक घटकांचा समावेश करतात, ज्यामुळे हे छोटे करण तुमच्या गादीवरून पांघरूण किंवा उशीपर्यंत जात नाहीत.

तणावाशी लढण्यासाठी मदत 
चांगली गादी तुम्हाला रोज वाटणारा तणाव कमी करण्यासाठी मदत करते. चांगली गादी तुमच्या शरीरासाठीही योग्य असते आणि त्यामुळे रोज सकाळी कोणत्याही वेदनेशिवाय तुम्हाला जाग येते व तुम्हाला अगदी रोज ताजंतवानं वाटतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)