जाणून घ्या : आधार कुठे बंधनकारक आणि कुठे नाही

नवी दिल्ली – सरकारी योजनांपासून ते शाळेत प्रवेश मिळवण्यापर्यंत अशा अनेक ठिकाणी सरकाने आधार कार्ड अनिवार्य केले होते. याविरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने आधार कार्ड संविधानिकरीत्या वैधच ठरवले. परंतु, आधार सक्तीमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. जाणून घेऊया कोणत्या गोष्टीत आधार बंधनकारक –

कुठे आहे आधार बंधनकारक –  
– पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य असणार आहे.
– आयकर रिटर्न दाखल करण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.
– सरकारी योजनेचा लाभ आणि सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्डवरील सक्ती कायम आहे. शिवाय, सुरक्षेच्या कारणासाठी आधार कार्ड सक्तीचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुठे बंधनकारक नाही आधार कार्ड- 
– मोबाईलमधील सीमकार्ड घेताना आता आधार कार्ड अनिवार्य नाही.
– बँक खाते आधार कार्डला लिंक करणे गरजेचे नाही.
– सीबीएसई, नीट, युजीसी सारख्या बोर्ड परीक्षांमध्ये आधार कार्ड सक्तीचे नसणार.
– ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्रवेशासाठी आधार कार्डची सक्ती नाही.
– १४  वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांकडे आधार कार्ड नसेल तर केंद्र आणि राज्य सरकार त्यांना कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवू शकत नाही.
– टेलिकॉम कंपनी, इ-कॉमर्स, खाजगी बँक आणि यासारख्या अन्य संस्था आधार कार्डची मागणी करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)