जाणून घेऊयात “इरावती कर्वे’ यांच्याविषयी

इरावती कर्वे (डिसेंबर 15, 1905 ते ऑगस्ट 11, 1970) या मराठी लेखिका होत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्‍वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्व होते.

आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते. नातेसंबंधांबद्दल योगदान दिले. इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. ‘मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)