जागेच्या व्यवहारातून धमकावून केली जबरी चोरी

पुणे- जागेच्या व्यवहारातून पोलिसात तक्रार दिल्यामुळे तीघांनी एका व्यक्ती रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांची दुचाकी बळजबरीने घेवून गेले. बिबवेवाडी परिसरात मंगळवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
लक्ष्मण जोरी (वय 44 रा. बिबवेवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार चंद्रशेखर रामचंद्र थोपटे आणि इतर दोघांविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण जोरी हे मंगळवारी दि. 24 एप्रिल रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पुणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होते. बिबवेवाडीतील बॅंक ऑफ महाराष्टलसमोरील चौकात सिग्नल लागल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली. तेव्हा आरोपी थोपटेसह तिघांनी त्यांना अडविले तसेच हिंगणे खुर्द येथील जागेच्या व्यवहारात आर्थिक फसवणुक प्रकरणी तु दिलेल्या तक्रारीमध्ये आम्हाला काही अडचण आली. तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीकडील 35 हजार रूपये किंमतीची दुचाकी जबरदस्तीने घेवून गेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नागराज बिराजदार हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)