जागा वाचविण्यासाठी मनपाचे विभागीय आयुक्तांकडे अपिल

सहायक रचनाकार संतोष धोंगडेंचे मार्गदर्शन
नगर – जुन्या कार्यालयाची कोट्यवधी रुपयांची जागा वाचविण्यासाठी महानगरपालिकेने नाशिकच्या आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे. जुन्या मनपा इमारतीच्या हक्काबाबतचा दावा मनपा विरुद्ध अहमदनगर एज्युकेशन सोसायटी असा सुरू आहे. या प्रकरणातील जागा शहरतील सिटीसर्वे क्रमांक 4770 मधील नऊ एकर 12 गुंठे आहे.
यासाठी मनपाचे पथक सातत्याने मेहनत घेत आहे. यापुर्वी देखील याच पथकाने पिंपळागाव माळवी येथील मनपाची सुमारे सातशे एकर जागा मनपाला मिळून देण्यात महत्वाची भूमिक बजावली होती. आताही नव्या प्रकरणात हेच पथक जागा वाचविण्यासाठी कायदेशी लढा देत आहे. या पथकामध्ये सहायक रचनाकार संतोष धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मिळकत व्यवस्थापन समितीवरील सेवानिवृत्त तहसीलदार सर्जेराव शिंदे, भूकरमापक रविंद्र जेवरे व खलील पठाण कार्यरत आहेत.
भूमिअभिलेख मध्ये याबाबतच्या दाव्याचा निकाल दि.22 जानेवारी 2018 रोजी मनपाच्या विरोधात गेला. ही बाब मनपासाठी मोठा धक्का होती. मुळात जागा हातची जाणे हा मनपाच्या दृष्टीने केवळ स्थावर मिळकतीचा विषय नसून प्रतिष्ठेचाही आहे. सुरुवातीला मनपाच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कल्याणराव बल्लाळ यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. त्यानंतर विद्यामान सहायक रचनाकार धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पथक काम करत आहे. या प्रकरणातील जागा शहरतील सिटीसर्वे क्रमांक 4770 मधील नऊ एकर 12 गुंठे आहे. दि.23 मार्च 1934 रोजी ही जागा मुन्सीपालिटीच्या मालकीची असल्याचा नर्णय तत्कालीन चौकशी अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यावर दि.22 जानेवारी 2018 रोजी मात्र मनपाच्या विरोधात निकाल गेला. दरम्यान बऱ्याच घडामोडी झाल्या व जागा मनपाकडे रहावी यासाठी मनपाच्या वरील पथकाने सातत्याने कागदोपत्री पाठपुरावा केला. आता यातील काही विसंगतीचे मुद्दे पकडून मनपा अपिलात गेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)