जागतिक व्यापारयुद्ध भारताच्या पथ्यावर: अरुण जेटली 

दीर्घपल्ल्यात भारतासाठी संधी 
नवी दिल्ली: सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे लघु पल्ल्यात काही प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र, दीर्घपल्ल्यात याचा भारताला लाभ होंणार असल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ते म्हणाले की, यामुळे आगामी काळात भारताचा व्यापार आणि मॅन्युफॅक्‍चरिंग वाढण्यास मदत होणार आहे.
त्यांनी देशातील उद्योगांना नैतिकता बाळगून उद्योग करण्याचा आग्रह केला. ते म्हणाले की, उद्योगांनी जे आहेत, ते कर वेळेवर देण्याची गरज आहे. कारण आगामी काळात योग्य पद्धतीने उद्योग न करणाऱ्यांना नादारी कायद्यामुळे मोठ्या अडचणी येणार आहेत. पीएचडी चेंबरच्या वार्षिक बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, जागतिक व्यापारयुद्धामुळे जागतिक पातळीवर सध्या संदिग्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम भारतावरही काही प्रमाणात होत आहे.
मात्र, याचे रुपांतर संधीत होणार आहे. या निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी भारतीय उद्योगांनी तयारी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता भारतात मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्‍चरिंग सुरू झाले आहे. जगातील अनेक कंपन्या त्यांचे काम भारतात करून घेत आहे. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ भारताकडे आहे. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रातूनही निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारावरून मतभेद निर्माण होत आहेत. त्याचा लाभ भारताला होण्याची शक्‍यता आहे. भारताची अमेरिकेला निर्यात वाढण्याची संधी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक व्यापारयुद्ध आणि इतर कारणांमुळे सध्या क्रुडचे दर वाढत आहेत. त्याचा भारतावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. कारण भारत आपल्या गरजेच्या 80 टक्‍के इतके क्रुड आयात करीत आहे. मात्र, ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. काही काळानंतर क्रुडचे दर योग्य पातळीवर येणार असल्याचे त्यांना वाटते. भारतात मुक्‍त व्यापारासाठी चांगली वातावरणनिर्मिती होत आहे. त्यामुळे केवळ देशातील व्यापार वाढणार नाही तर निर्यातही वाढणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, यासाठी उद्योगानी पूर्वीची कर चुकविण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण त्यामुळे दीर्घ पल्ल्यात उद्योग चालू ठेवणे अवघड होत असते. जीएसटी आणि इतर सुधारणांमुळे कर भरणा सोपा झाला आहे. त्याचा उद्योगांनी वापर करावा असे ते म्हणाले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)