# जागतिक व्याघ्रदिन : वाघाची संख्या वाढतेय; परंतु वेग मंदावला

जगातील सत्तर टक्के वाघ भारतात
नगर – जागतिक व्याघ्रदिनाला मान्यता मिळाल्यानंतरचा आज (ता. 29) चा व्याघ्रदिन नववा व्याघ्रदिन म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. सध्या त्याची संख्या वाढत असली, तरी वेग मात्र मंदावलेला आहे.जगातील 70 टक्के वाघ एकटया भारतात आहेत हे विशेष! जगातील सगळ्यात मोठा मांजरवर्गीय प्राणी म्हणून वाघाला ओळखले जाते. 36 प्रकारच्या मांजर प्रजाती अस्तित्वात आहेत. वाघाच्या गौरवासाठी 29 जुलै हा जागतिक वाघ दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

रशियातील सेंट पिटर्सबर्ग वाघ परिषदेत 29 जुलै 2010 साली जागतिक वाघ दिवस म्हणून घोषित केला गेला. बुद्धिवान, शक्तिवान, धूर्त, जंगल वास्तव्याला लागणारी सहनशक्ती उमदेपण वाघात आहे. जगात वाघाच्या एकूण सहा प्रजाती आहेत. बंगाल टायगर, सुमात्रा टायगर, मलेशियन टायगर, सैबेरिया टायगर, इंडो-चायनीज टायगर आणि कॅस्पियन टायगर. बंगाल टायगर भारताबरोबरच जवळच्या बांगलादेश, नेपाळ आणि पश्‍चिम म्यानमार येथे आहे. पांढरा वाघ बंगाल टायगरच्या रंगहीन प्रजातीत गणला जातो. सुमात्रा वाघ आणि पूर्व-दक्षिण चीनमधील वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्व-दक्षिण चीनमधील वाघ फक्त प्राणी संग्रहालयात शिल्लक आहेत. इतर दोन प्रजाती बाली टायगर आणि जावा टायगर नामशेष झाल्या आहेत. “स्टेटस्‌ ऑफ टायगर्स इन इंडिया’च्या अहवालानुसार देशात 2006 साली सुमारे 1411 च्या आसपास, 2010 च्या व्याघ्रगणनेत 1706 वाघ होते.2014 च्या व्याघ्रगणनेत केवळ साडेबारा टक्के वाघ महाराष्ट्रात वाढले आहेत. 2010 च्या जनगणनेत महाराष्ट्रात 169 वाघ होते. त्यात एकवीसने वाढ झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील 18 राज्यांमध्ये सुमारे 3 लाख 78 हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्रात व्याघ्रगणना पार पडली. जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारतात 30 टक्क्‌यांनी वाढ झाली आहे. कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामीळनाडू आणि केरळ या राज्यात वाघांची संख्या वाढली. देशभरातील विविध व्याघ्र प्रकल्पात 2 हजार 226 वाघ वास्तव्य करत असल्याचे 2014 ला झालेल्या व्याघ्रगणनेनंतर स्पष्ट झाले आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 303 वाघांची संख्या असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. त्यापैकी 203 वाघ असून 100 बछडे आहेत. राज्यात वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नायेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे.

भारतात 1973 साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्या वेळी देशात नऊ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या 38 वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ऑथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षांत वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यात आपला देश पुढे आहे. वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे.वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्‍यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. वाघांचे वास्तव्य असलेल्या परिसरांचा नैसर्गिक विकास करतानाच तिथे पाण्याचे तलाव निर्माण करून त्यांच्या पाण्याची सोय खोल जंगलातच करण्यात आली. तसेच मोठ्या जंगलात मोठ्या प्रमाणावर गवतक्षेत्र निर्माण करण्यात आले. त्यामुळे वाघांना जंगलातच भक्ष्याची सोय झाली.

आकडे बोलतात

जगातील 70 टक्के वाघ भारतात


ताशी 65 किलोमीटर वेगाने प्रवास


महाराष्ट्र सहा व्याघ्र प्रकल्प


3 लाख 74 किलोमीटर वनक्षेत्रात व्याघ्रगणना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)