जागतिक भाषावारीमध्ये मराठीचे नेतृत्व

3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग : वारीमध्ये होते 6 हजार भाषांचे फलक

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पेन इंटरनॅशनल कॉंग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक भाषावारी शुक्रवारी पार पडली. विद्यापीठामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भाषावारीची सुरूवात करण्यात आली. ही वारी बालगंधर्व रंगमंदिरपर्यंत होती. त्यात विविध संलग्न महाविद्यालयातील 3 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थ्यांनी जगभरातील 6 हजार भाषांचे फलक यावेळी हाती घेऊन वारीमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे प्रत्येक भाषेचे चार पद्धतीने होणारे उच्चार अथवा भाषेची ओळख या फलकांवर देण्यात आली होती. या वारीत विविध पारंपारिक दिंड्यांनी सहभाग घेऊन मराठी मौखिक परंपरेतील संतजनांचे अखंड नामस्मरण करून मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले. यावेळी विविध अभंगही त्यांनी सादर केले. ही भाषावारी विद्यापीठातून सेनापती बापट मार्ग, सिम्बायोसिस भवन, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, तुकाराम पादुका चौक, घोले रस्ता ते बालगंधर्व रंगमंदिर या मार्गावरून पूर्ण झाली.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांच्यासहित पेन इंटरनॅशनल कॉंग्रेसचे संचालक संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर, अध्यक्ष जेनिफर क्‍लेमंट, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)