जागतिक बॅंकेकडून कर्जपुरवठा

नवी दिल्ली- भारतात सर्वसमावेशक प्रकल्पांसाठी नवकल्पना यासाठी जागतिक बॅंकेसमवेत 125 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (समतुल्य) आयबीआरडी ऋणासाठी नवी दिल्लीत एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतातर्फे अर्थविषयक व्यवहार खात्याचे सहसचिव समीर खरे यांनी तर जागतिक बॅंकेतर्फे जागतिक बॅंकेचे भारतातले प्रभारी संचालक हिशम अब्दो यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

देशांतर्गत नवकल्पनेची जोपासना करणे, स्थानिक उत्पादन विकासाला चालना देणे आणि कौशल्य आणि पायाभूत सुविधा यामधली तफावत कमी करुन व्यापारीकरण प्रक्रियेला गती देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. देशात समावेशक विकासासाठी कल्पक आणि माफक दरात आरोग्य उत्पादन निर्मिती त्याचबरोबर देशात स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने हा करार करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)