जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचकांचा सन्मान

शिक्रापूर-जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शिरूर तालुक्‍यातील काही लेखकांनी वाचकांचा सन्मान करण्याचे कार्य चार वर्षांपासून हाती घेतले असून, आज काही वाचकांचा पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
आधुनिक काळामध्ये वाचक संस्कृती घराघरात रुजावी आणि समाजाचे पुस्तकाशी नाते जडावे, या हेतूने शिरूर तालुक्‍यातील लेखक सचिन बेंडभर, मनोहर परदेशी, कुंडलिक कदम हे प्रत्येक वर्षी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने वाचकांचा सन्मान करत असतात. आजपर्यंत त्यांनी ज्ञानेश्वर कसुरे, किसनराव फराटे, शकुंतला भुजबळ यांचा जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने सन्मान केला असून आजदेखील लेखक सचिन बेंडभर, मनोहर परदेशी, कुंडलिक कदम या लेखकांच्या वतीने निवृत्ती मारुती दरेकर व राजेंद्र नारायण यशवंत या वाचकांचा सन्मान करण्यात आला आहे. निवृत्ती दरेकर हे पेरणे फाटा येथील टेलरिंग व्यावसायिक असून त्यांनी आजपर्यंत वाचनाची आवड जोपासली आहे. वढू येथील ग्रंथालयातील बाराशेहून अधिक पुस्तके त्यांनी वाचली आहेत. तसेच राजेंद्र यशवंत हे शेतकरी असून त्यांना वाचनाची आवड आहे आणि स्वतः वाचलेली पुस्तके इतरांना उपयोगी यावी म्हणून त्यांनी ती पुस्तके ग्रंथालयांना भेट दिली आहेत. त्यामुळे या वाचकांचा आज पुस्तके, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला असून यावेळी शिवाजी गव्हाणे, दत्ता वेताळ, भगवान सोनटक्के हे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)