जांबे-आळंदी बस पुन्हा सुरू झाल्याने दिलासा

वाकड – सहा महिन्यांपूर्वी अचानक बंद केलेली जांबे-आळंदी बस सोमवार दि. 23 ला पुन्हा सुरू करण्यात आल्याने जांबे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. कमी उत्पन्नाचे कारण पुढे करून ही बस बंद केली होती.

सध्या जांबे ते डांगे चौक बस आहे. मात्र जांबे येथून आजुबाजूच्या वाड्या-वस्त्यांना, चिंचवड, पिंपरी, भोसरी, आळंदी भागांत जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. यामुळे नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व नोकरदारांचे हाल होत होते. जांबे गावातून चिंचवड, पिंपरी मार्गे आळंदी बस सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी माजी उपसरपंच अनिल मगर यांनी विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या मदतीने पाठपुरावा केला होता.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सोमवारी ग्रामस्थांनी बसची पूजा करून बसचे स्वागत केले. यावेळी सरपंच अंकुश गायकवाड, उपसरपंच शीला मगर, सदस्य गणेश गायकवाड, माजी उपसरपंच अनिल मगर, माजी उपसरपंच बबन गायकवाड, भगवान गायकवाड, राजेंद्र गायकवाड, राजू गायकवाड, संतोष बुचडे, राजाभाऊ विनोदे, रंजना गायकवाड, विजयराव गायकवाड, नवनाथ टेमगिरे, हभप सुमन जगताप तसेच भोसरी डेपोचे मॅनेजर केदारी, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)