जांबवडे गावामध्ये शाहू महाविद्यालयाच्या वतीने शंभर औषधी वृक्षांचे रोपण

जांबवडे : येथे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे वृक्षारोपण करताना विद्यार्थी.

इंदोरी – मावळ तालुक्‍यातील जांबवडे गावामध्ये ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेजतर्फे 100 औषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेत शाळा कॉलेजनेही सहभाग घेतला असून, त्यांनी विद्यार्थ्यांमार्फत वृक्षलागवड करण्यास चालू केलेली आहे. शाळा, कॉलेजमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच पर्यावरण शिक्षणही मुलांना देऊन त्यांची पर्यावरणाविषयी आवड निर्माण केली जात आहे.

या वेळी राजर्षी शाहू कॉलेजचे विक्रम देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी शुभांगी इंगळे, अजय शेलार, जांबवडे गावचे सरपंच सारिका घोजगे, उपसरपंच अंकुश घोजगे, माजी सरपंच अनिता नाटक, माजी उपसरपंच रमेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य विशाल घोजगे, विकास भांगरे, बाळासाहेब शिंदे, प्रशांत भोसले, उज्वला नाटक, योगेश नाटक, सागर नाटक, अनिल घोजगे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)