जसलीन हो गयी मगन

“बिग बॉस 12’मध्ये अनुप जलोटा यांच्या समवेत स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या जसलीन मथारूबाबत थोड्याच दिवसात खूपच चर्चा व्हायला लागली आहे. “बिग बॉस’च्या घरात जसलीन अनुप जलोटांच्या औषधांची, खाण्यापिण्याची अगदी व्यवस्थित काळजी करते आहे. या रिअॅलिटी शो मधील अन्य जोड्यांशिवाय या जोडीची चर्चाच अधिक होते आहे. जसलीन आणि अनुप जलोटा यांच्यात तब्बल 30-35 वर्षांचे अंतर आहे. त्यापेक्षाही जलोटा यांनी त्यांच्यात अफेअर नाही, तर केवळ संगीत हा एकमेव समान धागा असल्याचे सांगितले आहे. पण वास्तविक जसलीनमध्ये संगीताची काही पार्श्‍वभूमी आहे का, हे तरी तपासून बघितले पाहिजे.

जसलीनला अभिनयाची आवड आहे. तिचे वडील कैसर हे सिनेनिर्माते आहेत. त्यांनीच केलेल्या एका सिनेमाची हिरोईनही झाली होती. वडिलांच्या प्रॉडक्‍शनच्या “डर्टी बॉस’मध्ये तिने लीड रोल केला होता. नावाप्रमाणेच हा सिनेमा अगदी बोल्ड होता. जसलीनचा रोल तर त्यापेक्षाही बोल्ड होता. जसलीनचे पिता कैसर मथारू यांनीच या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले होते. आपल्या घरच्या प्रॉडक्‍शनच्या सिनेमामध्ये खरे तर जसलीनवर कोणतीच जबरदस्ती नव्हती. मात्र तरीही तिने “टू पीस’ स्वीमिंग कॉश्‍च्युममध्ये बोल्ड सीन दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिच्या या बोल्ड अवतारामुळे तिच्याकडे बी ग्रेड सिनेमांची रांग लागणे स्वाभाविक होते. आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुपम खेर यांच्या भावाला, राजू खेर याच्यावरही जसलीनची भुरळ पडली होती. या सिनेमामध्ये राजू खेरही होता. दोघांनी स्क्रीनवर रोमान्सही केला. अनुप जलोटांबरोबरच्या रिलेशनशीपबाबत जसलीनचे पप्पा मात्र चांगलेच नाराज आहेत. कारण गेल्या वर्षी जसलीन जलोटांच्या मुलाची आई होणार होती. पण तिने योग्यवेळी ही शक्‍यता टाळली, अशी चर्चा होत होती. जसलीनबाबत नव्याने उजेडात येणारी एक एक गोष्ट खूपच रोचक रंजक आहे. मात्र भजन सम्राट अनुप जलोटांशी तिचे नाव जोडले जाणे हे सर्वाधिक रोचक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)