जवानांच्या कुटुंबियांच्या रक्षणाची जबाबदारी गावकऱ्यांची : शर्मा

भाळवणी – सीमेवर लढण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या रक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. गावा गावात एकोपा निर्माण व्हावा असे मत जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी केले. टाकळी खातगाव (ता. नगर) येथील शहीद जवान सुरेश नरवडे यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होते. त्यावेळी शर्मा बोलत होते. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण, नामदेव काळे, सरपंच सुनील नरवडे, उपसरपंच हारून शेख, हनुमान शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य साहेबराव कुलट, पर्यवेक्षक सुभाष नरवडे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पालवे, रा. वी. शिंदे, प्रा. संतोष दळवी, विलास पिसे, प्रा. केशव चेमटे, प्रा. संजय दुधाडे आदी उपस्थित होते. शर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय व उद्देश ठेवून काम केले पाहिजे. जीवनात उद्देश नसेल तर भरकटत जावे लागेल. आईवडील व गुरूजन यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनात यशस्वी होता येते. यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानने रक्‍तदान शिबिर घेतले. ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. या निमित्त भास्कर महाराज भाईक यांचे कीर्तन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)