“जलशिवार’मुळे कवठेत जलक्रांती

कवठे-केंजळ योजनेचे पाणी पोहचले कवठे गावात
आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश, वर्षानुवर्षाचा दुष्काळ संपला
वाई, दि. 31 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍याचा पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यातील गाव म्हणून कवठे गावाची ओळख होती. गावातीलच अभियंता भूषण डेरे यांच्या संकल्पनेतून, सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. आश्विन मुद्‌गल यांच्या सहकार्यामुळे व आ. मकरंद पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे कवठे गावात जलशिवार अभियान प्रभावीपणे राबविल्याने कवठे गावात एकोपा ठेवून परिश्रम घेतल्याने गावातील दुष्काळ हटविण्यात कवठेकराना यश आले आहे.
कवठे गावातील चंद्रभागा ओढ्यावर श्रमदानातून बंधारे बांधून त्यात कवठे-केंजळ योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यासाठी नितीन पाटील यांनी स्वतः उभे राहून कवठे-केंजळ योजनेतून डायरेक्‍ट पाईप जोडून कवठेच्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बंधारे पूर्णपणे भरले आहेत. कवठेसह बोपेगाव, पांडे, खानापूर याही गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे. कवठे गाव व परिसरातील ओढे-नाले भरून वाहत आहेत. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यात यश आले आहे. हे सर्व आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कवठे गावाच्या एक-जुटीमुळे शक्‍य झाले आहे. कोणतेही मतभेद न ठेवता जलशिवारयुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघाला आहे. कवठे गावाने दाखविलेला एकोपा हा इतर गावांसाठी आदर्शवत आहे.
कवठे-केंजळ योजनेचे पाणी दोन दिवसापूर्वी कवठे गावाच्या बंधाऱ्यात सोडण्यात आले होते. परंतु, दोन-तीन ठिकाणी लिकेज झाल्याने गावाच्या पाण्याचा प्रश्न अपूर्ण राहतोय की काय अशी अवस्था झाली असताना गावाने रात्रीचा-दिवस करून सर्व लिकेज काढून सुरळीत केल्याने काल रात्री 7 वाजता पाणी कवठ्याच्या बंधाऱ्यात सोडण्यात आले. कारण अनेक वर्षानंतर भरलेला ओढा गावकऱ्यांनी पहिला होता. एकजुटीने केलेले कोणतेही काम यशश्वी होते याचा प्रत्यय कवठे ग्रामस्थांना आला आहे. एकंदरीत कवठे गाव व परिसरातील दुष्काळी परिस्तिथी काही अंशी कमी होण्यास सहकार्य झाले आहे. लोकांचे आर्थिक गणित बदलले आहे. पाईप लाईन टाकून पाणी आणण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यामध्ये उपसरपंच संदीप डेरे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पोळ, दत्तात्रय पोळ, बाजी पोळ, दिनकर डेरे, विक्रम डेरे, शशिकांत करपे, प्रवीण डेरे, कृष्णराव डेरे, मारुती पोळ, माधवराव डेरे, जितेंद्र डेरे, माजी सरपंच बाळासाहेब घाडगे, भीमा जगताप यांचा समावेश आहे.

जलक्रांतीसाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा
कवठे गाव हे क्रांतीकारकांचे गाव असल्याने लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण सामाजिक कार्यात हिहीरीने सहभागी होताना दिसतात. दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या कवठे गावात निव्वळ गावातील एकोप्यामुळेच जलक्रांती झालेली आहे. कवठे गावातील काढण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे गावासह परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असून गावाच्या विकासात भरच पडली आहे. शासनच्या जलशिवार योजनेच्या कामात जेष्ठांसह तरुणांनी सहभाग नोंदविल्याने कवठे गाव दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडले आहे.
राहुल डेरे, प्रगतशील शेतकरी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)