जलतांडव : महापौरांवर नागरिकांचा रोष

पुणे : शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या खडकवासला कालव्याला गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी पूल परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये घुसले, अचानक आलेल्या या पाण्याने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. यामुळे सुमारे 700 झोपड्या बाधित झाल्या तर संसार वाहून गेले आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास महापौर मुक्ता टिळक घटनास्थाळी भेट देण्यासाठी गेल्या. मात्र, यावेळी त्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. महापौरांनी काही बोलण्याच्या आतच नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत “आमचा संसार कोण भरून देणार’ असा सवाल करत, इथून निघून जाण्याची घोषणाबाजी केली. यावेळी महापौरांसमवेत स्थानिक नगरसेवकही होते. मात्र, त्यांनाही नागरिकांनी बोलू दिले नाही.

आज घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. ही बाब महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या घटनेत आम्ही नागरिकांसोबत असून महापालिकेकडून त्यांची तात्पुरती जेवणाची व्यवस्था तसेच निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय, महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाच्या वतीने संयुक्तरित्या या नागरिकांना तातडीने मदत दिली जाईल. त्यासाठी महापालिका आयुक्त आणि पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेतले जातील.

– मुक्ता टिळक (महापौर)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)