जर्मनीत आढळला दुसऱ्या महायुद्धातील जिवंत बॉम्ब

18 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
फ्रॅंकफर्ट – जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब सापडलेल्या ठिकाणाजवळच्या सुमारे 18 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अखेरीस जर्मनीच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने हा बॉम्ब निकामी केला.

सुमारे 500 किलो वजनाचा हा बॉम्ब अमेरिकन फौजांनी येथे ठेवलेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बॉम्ब सापडल्यानंतर येथील एक हजार मीटरच्या परिसरातील घरे खाली करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बॉम्ब निकामी करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी सुमारे एक तासाचा अवधी लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर्मनी आणि फ्रान्समध्ये दुसऱ्या महायुद्घाच्या काळातील बॉम्ब आढळणे ही सामान्य बाब आहे. काही महिन्यांपूर्वीच फ्रान्समधील नॉमर्डी येथे सुमारे 220 किलोचा बॉम्ब सापडला होता. तसेच गतवर्षी फ्रॅंकफर्ट येथे 1.8 टन वजनाचा ब्रिटिशांनी ठेवलेला बॉम्ब आढळल्याने तेथील सुमारे 60 हजार रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. आता हा बॉम्ब निकामी केला असून स्थानिक रहिवासी आपापल्या घरी परतू शकतात, अशी माहिती बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातिल अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)