नारायणगाव-इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथील वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निक डी-1 झोन अंतर्गत पार पडलेल्या ऍथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत कुरण येथील जयहिंद पॉलिटेक्निकच्या खेळाडूंनी रिलेमध्ये विजेतेपद आणि 400 मीटर धावणे, थाळीफेकमध्ये यश मिळविले, अशी माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य योगेश गुंजाळ यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे जयहिंद पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व दाखवत विविध बक्षिसे मिळविली. विजयी संघ व यशस्वी विद्यार्थी याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका शुभांगी गुंजाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे यांनी अभिनंदन केले. स्पर्धेतील विजयी खेळाडू पुढील प्रमाणे, रिले- विजेतेपद -स्वप्निल खिलारी, क्षितीज आतकरी, धनराज पाटोळे, शुभम महाकाळ, आदिल शेख. 1500 मीटर धावणे- सुवर्णपदक- स्वप्निल खिलारी, 400 मीटर धावणे- सुवर्णपदक- स्वप्निल खिलारी, 800 मीटर धावणे, रौप्यपदक- क्षितिज आतकरी, थाळीफेक-रौप्यपदक- अभिषेक चौधरी तसेच समर्थ पॉलिटेक्निक येथे आयोजित केलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये खो-खो या क्रीडाप्रकारात जयहिंदच्या संघास उपविजेतेपद मिळाले. तिहेरी उडी या प्रकारात दिव्या सुपेकर हिने प्रथम व दिव्या मुळे हिने द्वितीय क्रमांक मिळावला. उपविजयी संघ व सर्व विजेते खेळाडू यांची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाविभाग प्रमुख प्रा. डी. के. आबुज, हर्षल रणपिसे, डुंबरे मॅडम व डोंगरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य गुंजाळ यांनी दिली.
जयहिंद पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
Ads