जयकर बंगल्यात होणार डिजिटल लायब्ररी

केंद्राचाही निधी : चित्रपट संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार

विधि महाविद्यालय रस्त्यावरील ब्रिटिशकालीन जयकर बंगल्यात आता चित्रपट संशोधकांसाठी लवकरच डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा बंगला गेली काही वर्षे बंद होता. “ऐतिहासिक वास्तू’ अशी नोंद असलेला हा बंगला आता डिजिटल लायब्ररीच्या स्वरुपात पाहता येणार आहे. या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी केंद्र सरकारने 4 कोटी रुपये निधी संग्रहालयाला दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर हे 1947-56 दरम्यान येथे वास्तवास होते. त्यानंतर हा बंगला काही काळ मुलींच्या वसतिगृहासाठी वापरण्यात आला होता. यामध्ये अभिनेत्री जया भादुरी, शबाना अजमी या सिनेतारका देखील येथे वास्तवास होत्या. या बंगल्याची मालकी राष्ट्रीय फिल्म संग्राहलायला देण्यात आली. तेथे “एफटीआयआय’ च्या संचालकाचे कार्यालय होते. मात्र, काही काळानंतर तेही बंद झाल्याने. हा बंगला वापराविना पडून होता. म्हणून राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाने बंगल्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला.
बंगल्यात अप्रतिम लाकडी कलाकुसर आहे. बंगल्याचे नूतनीकरण करताना त्याच्या मूळ स्वरुप कायम ठेवून नूतनीकरण केले जात आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही ऐतिहासिक वास्तू वापरात येण्यासाठी बंगला नूतनीकरणाचा निर्णय घेतला आहे. चित्रपट संशोधकांसाठी डिजिटल लायब्ररीत संग्रहालयाकडे उपलब्ध असलेला सर्व डिजिटल डेटाबेस, दुर्मिळ छायाचित्र, 15 हजारांहून अधिक पोस्टर्स, सॉंग बूक, फिल्म इंडियांसारखे दुर्मिळ मासिके, फिल्मफेअर आदी संशोधनासाठी उपयुक्त वस्तू येथे आहेत . बंगल्याच्या वरच्या मजल्यावर संशोधकांना सिनेमा पाहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
– प्रकाश मगदुम, संचालक, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)