जम्मू-काश्‍मीरमध्ये चार वर्षांत 581 दहशतवाद्यांचा खातमा

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी चार वर्षांत 581 दहशतवाद्यांना ठार केले. तर चार वर्षांच्या कालावधीत पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करून केलेल्या माऱ्यात 69 भारतीय जवान शहीद झाले.

ही माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. जम्मू-काश्‍मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत 2015 मध्ये 108 दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांनी 2016 आणि 2017 या वर्षांत अनुक्रमे 150 आणि 213 दहशतवाद्यांचा खातमा केला. तर चालू वर्षी 22 जुलैपर्यंत 110 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी सैनिक वारंवार कुरापती काढून शस्त्रसंधीचा भंग करतात. त्या घटनांमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय हद्दीत मारा केला जातो. त्या शस्त्रसंधी भंगाच्या घटनांमध्ये 2015 पासूून भारतीय लष्कराचे 44 तर भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) 25 जवान शहीद झाले. पाकिस्तानी माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. भारतीय प्रत्युत्तरात मोठे नुकसान होऊनही पाकिस्तानला शहाणपण सुचत नसल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)