जम्मू काश्मीर; एनएसजी करणार दहशतवाद्यांविरोधात कारवाई

नवी दिल्ली : एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. दहशवतादी हल्ला आणि लोकांना बंधक बनवण्याच्या घटनांचा बिमोड करण्याचा विचार करत आहे. गृहमंत्रालयाने काश्मीर खोऱ्यात एनएसजी तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दहशतवाद्यांसोबतचार हात करण्यासाठी भारतीय जवानांना, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी ही कमांडो काम करतील. त्यासाठी कमाडोंना प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधी देखील काश्मीरमधील पूर्व खोऱ्यात ब्लॅक कमांडो तैनात करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये यामुळे सुरक्षेच्या बाबतीत मोठा फायदा होऊ शकतो. गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी एनएसजीच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, सुरक्षेच्या बाबतीत येणाऱ्य़ा आव्हानांना कमी करण्यासाठी एसएसजीची भूमिका कशी बदलता येईल. कारण दहशतवादी लोकांना पुढे करुन आणि नागरिकांच्या परिसरात घुसून लपतात. अशा स्थितीत हे कमांडो मोठी भूमिका बजावू शकतात. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर 1984 मध्ये एनएसजीचं गठन करण्यात आलं. ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान पंजाबच्या अमृतसर शहराच स्वर्ण मंदिरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा एनएसजीने खात्मा केला होता. एनएसजीमध्ये 7,500 जवान तैनात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)