जबरी चोरी प्रकरणात मोक्का न्यायालयाने वाढविली तिघांची पोलीस कोठडी

पुणे- कोल्हापूर येथे सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशांना दमदाटी करून मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रांची जबरी चोरी केल्याप्रकरणात तिघांच्या पोलीस कोठडीत 2 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
विशेष मोक्का न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे.
मुकेश कांतीलाल चव्हाण (22, रा. बनकर कॉलनी, सातववाडी, हडपसर), निखील रविंद्र बामणे (23, रा. जुनी वडारवाडी, चतुःश्रृंगी) आणि अरबाज युनुस पठाण (26, रा. गायकवाड सोसायटी, कोंढवा) अशी पोलीस कोठडी वाढ केलेल्या तिघांची नावे आहेत. अशोक गणपत बनसोडे (34, रा. गोंधळेनगर, हडपसर) आणि मोहसिन आयुब पठाण (27, रा. कौसरबाग, कोंढवा) यांच्यावरही चतुश्रंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत योगेश भिमसेन कुंभार (27, रा. कागल जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. दि. 29 नोव्हेंबर 2017 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाकड येथील भुमकर चौकात फिर्यादी हे कोल्हापूर येथे जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळील स्क्वॉडा कारमधून तेथे आले. त्यांनी कुंभार यांना कोल्हापूर येथे जाण्यासाठी विचारणा केली. काही अंतरावर जाताच आरोपींनी त्यांना दमदाटी करून त्यांच्या जवळील मोबाईल, महत्वाची कागदपत्र काढून घेतली. कुंभार यांना आरोपी निर्जळस्थळी सोडून पसार झाले. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी तिघाना न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)