जपानमध्ये चक्रिवादळामुळे विमानसेवा ठप्प

टोकियो – जपानमध्ये चक्रिवादळाचा धोका निर्माण झाल्यामुळे दिवसभर सर्व विमानसेवा ठप्प झाली होती. चक्रिवादळामुळे जपानच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील झाला. पावसामुळे पूर आणि दरडीकोसळण्याच्या घटनाही या महिन्यामध्ये घडल्या आहेत.

जपानच्या पॅसिफिक किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रिवादळ घोंघावत पुढे सरकत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हे चक्रिवादळ जपानच्या किनाऱ्यावर थडकण्याची शक्‍यता आहे. या वादळाच्या प्रभावामुळे ताशी 126 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहेत. वाऱ्याचा वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वादळाच्या संभाव्य धोक्‍यामुळे जपानमधील मारोता आणि हानेदा या दोन्ही प्रमुख विमानतळांवरून उड्डाण करणाऱ्या विमानांची उड्डाणे एकतर रद्द करण्यात आली किंवा उशीराने होत होती. रद्द होणारी बहुतेक विमाने देशांतर्गत प्रवासाची होती. तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही थंड होती. वादळामुळे टोकियो आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाली आहे. वादळ जमिनीवर येईपर्यंत या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)