जपानमधील 77 हजार बौद्ध मंदिरात होणार निवासी सुविधा

टोकियो (जपान) – जपानमधील सुमारे 77 हजार बोद्ध मंदिरांत निवासी सुविधा सुरू होणार आहे. आजवर अशी सुविधा नव्हती. काही ठरावीक मंदिरातील खोल्या निवासासाठी प्रवाशांना देत येत होत्या. आता सन्‌ 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचा विचार करून कायद्यात बदल करण्यात येत आहे. सन 2020 पर्यंत जपानामध्ये असणारी रिसॉर्टची कमतरता दूर करणे हा यामागचा हेतू आहे. हा कायदा 15 जूनपासून लागू होणार आहे.

ओसाका येथील एका पर्यटन कंपनी तराहाकूच्या सुपीक डोक्‍यातून आलेल्या कल्पनेनुसार कॉंप्युटर वा मोबाईल फोनद्वारे या मंदिरांत राहण्यासाठी रूम बुक करता येणार आहे. त्यासाठी एयर बीएनबी आणि बुकिंग डॉट कॉमबरोबर भागीदारी करण्यात आलेली आहे. ग्राहक संशोधन करून इंग्रजीतून बुकिंग करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. बौद्ध मंदिरात एक रात्र राहण्याचे दर 10,000 ते 20,000 येन म्हणजे सुमारे 7,000 ते 14,000 रुपये असतील. येथे राहायला येणारांना मेडिटेशन, सूत्रलेखन, सकाळची प्रार्थना याबरोबरच बौद्ध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येणाऱ्या पर्यटकांना पारंपरिक जपानी संस्कृती आंणि इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात ही साईट लॉच होईल तेव्हा सुमारे 100 मंदिरांची यादी उपलब्ध असेल. पुढील 3 वर्षांत ही संख्या 1,000 पर्यंत वाढणार आहे.

जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. 2017 मध्ये 2.87 कोटी पर्यटकांनी जपानला भेट दिली. 2020 पर्यंत ही संख्या 4 कोटीपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)