जन्म-मृत्यू दाखल्यांची सुविधाही “स्मार्ट’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. मात्र, महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून शहरात दहा ठिकाणी दाखला मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नागरिकांना विविध कामांसाठी जन्म अथवा मृत्यूच्या दाखल्याची आवश्‍यकता सतत भासत असते. मागील काही महिन्यांपूर्वी या दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस लागत होते. मात्र, सध्या या प्रकारचे दाखले ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध झाल्याने नागरिकांना सोईस्कर ठरत आहे. महापालिका प्रशासनाने दाखले मिळण्यासाठी खासगी संस्थेला टेंडर दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संस्थेमध्ये शहरात एकाच ठिकाणी दाखले मिळत असल्याने त्या ठिकाणी सतत गर्दी होत होती. यामुळे, दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना सतत हेलपाटे मारावे लागत होते. परंतु, नागरिकांच्या वेळेची बचत होण्यासाठी प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी दाखले उपलब्ध होण्याची सोय करुन दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)