जनतेच्या विकासासाठी मी बांधील

एकलहरे येथे खासदार डॉ. कोल्हे यांची ग्वाही

मंचर- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून माझा विजय सुकर केला. जनतेच्या विकासासाठी मी बांधील आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.

एकलहरे (ता. आंबेगाव) येथील हॉटेल रवीकिरण येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. गाडीतून उतरताच तरुणांनी खासदार डॉ. कोल्हे यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. यावेळी तरुणांनी सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, फटाक्‍यांची आतिषबाजी करुन घोषणा देण्यात आल्या.

यावेळी युवानेते अतुल बेनके, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, विष्णु कानडे, अनिल भालेराव, मोनिका भालेराव, उद्योजक युवराज कानडे, दशरथ थोरात, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष किसन कहडणे, अनिल कानडे, शिक्षक बाळासाहेब कानडे, संतोष थोरात, संतोष कानडे, अमित भालेराव, गोकुळ भालेराव, दत्ता कानडे, निलेश कानडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.