जटामांसीचे हे ‘६’ औषधी उपयोग माहिती आहेत का?

जटामांसी हे अत्यंत उपयुक्‍त असे आयुर्वेदिय शास्त्रात मानले आहे. याची मुळे एकदम सुगंधी असतात.

वातावर उपयोगी – बागरमोथ्यासारखी फार जटा असलेली ही सुगंधी मुळे असतात. ही वातावर उपयुक्‍त आहेत. वात विकारात जटामांसीचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण 1 ग्रॅम, 1 ग्रॅम वेखंड व त्यात भिजेल इतका मध घालून दिवसातून 3 वेळा घेतल्याने वात कमी होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्तव साफ होण्यासाठी – याने आर्तवही साफ होते. जटामांसी व दशमुळे या अकरा औषधी प्रत्येकी 3 ग्रॅम घेऊन अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश उरवून केलेला काढा सर्व प्रकारचे वायुविकारांवर देतात.तसेच मासिक पाळीच्या तक्रारी दूर करतो.

रक्‍तशुद्धी करण्यासाठी – मंजिष्ट 10 ग्रॅम व 20 ग्रॅम जटामांसी ठेचून 1 लिटर पाण्यात घालून 1/8 लिटर काढा करावा व तो एक वेळ प्यावा. सर्व विकार बरे होतात.रक्‍तशुद्धी होते.

केस वाढण्यासाठी – जटामांसी सुगंधी असून केस वाढविणारी आहे म्हणून अनेक प्रकारची सुगंधी केशवर्धक तेल यापासून करतात. मस्तक शांत ठेवून केसांची वाढ करणारी अशी ही जटामांसी आहे.

स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात – जटामांसीचा उपयोग मासिक पाळीत नियमित येण्यासाठी तसेच पोटदुखीच्या तक्रारी दूर करण्यासाठी जटामांसीचा काढा उपयुक्‍त आहे.

निद्रानाशावर – जटामांसीचे तेल टाळूवर मसाज करून चोळले असता डोके शांत होते व झोप चांगली लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)