जगावेगळा ‘बॉटल मॅन’

लहानपणी बहुधा प्रत्येक जणच लोखंडाला चुंबक चिकटवण्याचा “उद्योग’ केला असेल ! शाळेतील कंपासपेटीच्या आत अथवा बाहेरच्या बाजूला गोलाकार चुंबक चिकटवणारी अनेक मुले आजही दिसतात. लोखंडाला चुंबक चिकवटताना अथवा चिकटलेले चुंबक काढून घेताना जाणवणाऱ्या चुंबकीय प्रवाहाची मज्जा बहुतेकांनी अनुभवलेली असते. पुढे जाऊन माणसाच्या शरीरात चुंबकीय शक्‍ती असते, असे काहींचे म्हणणे असल्याचे ऐकिवात येते.

अलीकडील काळात जगभरातील माहिती सहजगत्या उपलब्ध होऊ लागल्यामुळे शरीरावर चमचे, लोखंडी वस्तू चिकटवून ठेवू शकणारे ‘मॅग्नेट मॅन’ आणि “मॅग्नेट बॉय’ यांचे दर्शन माध्यमांमधून घडू लागले आहे. अशाच “आकर्षक’ माणसांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. ही व्यक्‍ती बाटल्या चिकटवून ठेवते म्हणे! थांबा “बाटल्या’ म्हटल्यानंतर वेगळे विचार मनात आणू नका. हा माणूस त्याच्या डोक्‍यावर, कपाळावर तो एखाद्या चुंबकासारखेच बाटल्या, कॅन धारण करून ठेवू शकतो. अमेरिकेतील ही व्यक्‍ती “बॉटल मॅन’ म्हणून ओळखला जातो.

शिकागोमधील या माणसाचे नाव जेमी किटन असे आहे. त्याला एक दुर्मीळ त्वचाविकार आहे आणि त्यामुळेच त्याच्या त्वचेवर बाटल्या किंवा धातूचे कॅन असे चिकटून राहू शकतात. त्याला “कॅन हेड’ म्हणूनही ओळखले जाते. याच क्षमतेमुळे त्याच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्येही झाली आहे. तो आपल्या डोक्‍यावर पाण्याची बाटली चिकटवून लोकांना पाणी पाजवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी तो आपल्या या क्षमतेचे असे अनेक वेळा प्रदर्शन करीत असतो.

तो सात वर्षांचा होता त्यावेळी त्याला आपल्यामधील या क्षमतेची प्रथम जाणीव झाली. आता त्याने या क्षमतेला कमाईचे साधनही बनवले आहे. अनेक ब्रॅंडच्या जाहिरातीही तो आपल्या डोक्‍यावर चिकटवून घेतो! त्याबद्दल त्याला एका आठवड्यात सुमारे 1500 ते 8 हजार डॉलर्सचीही कमाई होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)