जगाच्या तुलनेत 20 टक्‍के बालमृत्यू भारतात

भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे लसीकरण जनजागृती सप्ताह

पुणे – जगातील बालमृत्यू प्रमाणाच्या 20 टक्‍के प्रमाण हे फक्‍त भारतात असल्याचे जागतिक आकडेवारीवरून समोर आले आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या लसीकरणाबाबत आजही भारतात हवी तशी जनजागृती नसल्याचे समोर आले आहे. येत्या 24 ते 30 एप्रिल रोजी जागतिक लसीकरण दिवस साजरा केला जात असून या सप्ताहानिमित्त भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.

पाच वर्षांपर्यंत बालकांना विविध रोगप्रतिबंधक लस देणे गरजेचे असताना लसीकरण हा मुद्दा देशातील काही प्रकारच्या नागरिकांसाठी गौण विषय आहे. मात्र, राष्ट्रीय सर्व्हेक्षण 2015-16 (एनएफएचएस 4)च्या आकडेवारीनुसार भारतात पूर्णपणे लसीकरण झालेल्या मुलांचे प्रमाण हे अवघे 62 टक्‍के आहे. याचाच अर्थ 38 टक्‍के बालक हे आजही कोणत्याही लसीशिवाय जगत आहेत. त्यामुळेच भारतात बालमृत्यूचे प्रमाण मोठे आहे. यासाठी 2014 साली शासनाने इंद्रधनुष्य नावाची योजना सुरू केली त्यात 7 प्रतिबंधक लस बालकांना देण्यात येत होत्या. मात्र, तरिही अद्याप बालमृत्यूचे प्रमाण तितकेसे कमी झालेले नाही.

भारतीय बालरोग संघटनेने या जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त या सर्व आकडेवारीवर प्रकाश टाकत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊले टाकण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ललवाणी म्हणाले, प्रत्येक दोन मिनिटाला देशात एक निमोनियाचा बळी जातो आहे. महाराष्ट्रातही एक हजार बालकांमागे एक वर्षाच्या आतील बालकांच्या दगावण्याचे प्रमाण हे 19 इतके आहे. तर यावेळी उपस्थित डॉ. प्रकाश डोके म्हणाले, आपल्याकडे आजही 3 हजार 264 गावांमध्ये जायचे असेल तर बोटीतून प्रवास करावा लागतो. आज शहरी भागांत अनेक बालरोगतज्ज्ञ आहेत मात्र दुर्गम भागांत एकही बालरोगतज्ज्ञ नाही अशी अवस्था आहे.

तर डॉ. प्रमोद जोग म्हणाले, अनेक पालक पहिले वर्षभर किंवा पहिले पाच वर्षे बालकाची काळजी घेतात. परंतु, नंतर मात्र त्या लसींचे बुस्टर डोस देण्यास विसरतात. किमान दहा वर्ष मुलांना वेगवेगळ्या लसी देणे गरजेचे आहे.

प्रतिकारशक्‍ती वाढविणे गरजेचे
ज्या मुलांना लस दिली जाते त्यांच्या विष्ठेतून त्या प्रतिबंधक लसीमुळेदेखील वातावणातील संबंधित रोगाला प्रतिबंध केला जातो. त्यामुळे बालमृत्यू कमी करण्यासाठी लसीकरण करून शंभर टक्‍के बालकांना यातून बाहेर काढणे हे उद्घिष्ट तर आहेच. मात्र जर हे उद्धिष्ट पूर्ण झाले नाही तरीही संख्या कमी होण्याची गरज सामाजिक प्रतिकारशक्‍ती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)