जगण्यासाठी संवाद महत्त्वाचा

संगीता धायगुडे : धनगर संवाद पुस्तकाचे प्रकाशन

बिदाल, दि. 24 (प्रतिनिधी) – प्रत्येक माणसाला जगण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. भारतातील धनगर समाजाचे संवाद एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे मेंढपाळ जेव्हा शिट्टी मारतो जेव्हा मेंढ्या लगेच जवळ येतात, असे मत आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.
धनगर संवाद पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. आ. रामहरी रुपनवर, प्रभाकर देशमुख, धनगर संवादाचे लेखक आकाश दडस, भाजपचे नेते गणेश हाके, आर. एस. चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संगीता धायगुडे बोलताना म्हणाल्या की, धनगर समाज, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती, संस्कृती, खास त्यांची लोकगीते, कथा, उत्सव, धार्मिक श्रद्धा, खाद्यसंस्कृती अशा सर्व गोष्टीं ते वेध घेते आणि म्हणूनच हे आत्मकथन म्हणजे धनगर समाजाविषयीचा उत्तम दस्ताऐवज हे धनगर संवाद पुस्तक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आ. रामहरी रुपनवर म्हणाले, समाजाला सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक विकास करायचा असेल तर त्याला इतिहास विसरून चालत नाही. इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत. आणि जे इतिहास घडवतात ते इतिहास विसरू शकत नाहीत. म्हणूनच धनगर समाजानेही आपला गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले पाहिजे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.