जखीणवाडीत किरकोळ कारणावरून चाकू हल्ला

कराड, दि. 30 (प्रतिनिधी) – जखिणवाडी, ता. कराड येथे वैभव शंकर काकडे व अनिकेत उर्फ वैभव बाळू खरात यांच्यावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला केल्याप्रकरणी अविनाश अशोक येडगे व राजू उर्फ पृथ्वीराज बाळासो येडगे (दोघे रा. जखीणवाडी, ता. कराड) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैभव शंकर काकडे हा मावस भाऊ राजू उर्फ पृथ्वीराज बाळासो येडगे यास अविनाश अशोक येडगे हा गुंडगिरीतील असून त्यांच्यासोबत फिरू नको असे म्हणाला. त्या गोष्टीचा राग मनात धरून अविनाश अशोक येडगे व राजू उर्फ पृथ्वीराज बाळासो येडगे या दोघांनी संगनमत करून वैभव शंकर काकडे व अनिकेत उर्फ वैभव बाळू खरात (दोघे रा. धोंडेवाडी, ता. कराड) यांच्यावर जखिणवाडी (ता. कराड) येथे चाकुने वार करून जखमी केले. याप्रकरणी अविनाश शंकर काकडे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून अविनाश अशोक येडगे व राजू उर्फ पृथ्वीराज बाळासो येडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि पाटील करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)