जखमी वारकऱ्यांसाठी शिवसेनेकडून मदत 

दिड लाखांची रूपयांची केली मदत

प्रभात वृत्तसेवा
पुणे   : दिवे घाटात पालखी दिडींत जेसीबी घुसल्याने जखमी झालेल्या वारकऱ्यांवर हडपसर येथील नोबेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या वारकऱ्यांच्या उपचारसाठी शिवसेनेच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दिड लाख रूपयांची रोख मदत शुक्रवारी देण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे, नगरसेविका संगीता ठोसर, उपशहर प्रमुख समीर तुपे, नगरसेवक विजय देशमुख यांच्यासह भानगिरे यांच्या वतीने ही मदत देण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी पंढरपूर ते आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटात वारीत जेसीबी घुसल्याने मोठा अपघात झाला. दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर हडपसर येथील नोबेल रूग्णालयात उपचार चालू आहे. या वारकऱ्यांना उपचाराच्या लागणाऱ्या खर्चासाठी ही मदत करण्यात आल्याचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी सांगितले. यावेळी महिला शिवसैनिकही मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.