जंगलातील जनावरे वाघाला हरवू शकत नाहीत – देवेंद्र फडणवीस

मोदी वाघ आहे, अन्‌ वाघाला कोणीही हरवू शकत नाही

मुंबई,
आगामी निवडणूक मोदींसाठी नव्हे, तर देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या विकासाचा वेग पुढील दहा वर्षे कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून दिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. जंगलातील कितीही जनावरे एकत्र आली तरी ती वाघाला हरवू शकत नाहीत. नरेंद्र मोदी वाघ आहे आणि वाघाला कोणीही हरवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.

राज्यस्तरीय सीएम चषक स्पेर्धेचा समारोप सोहळा मुंबईतील सोमैय्या मैदानात रविवारी सांयकाळी पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, योगेश टिळेकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. पण विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. बाकी सर्व नेते केवळ आपापल्या भागाचे नेते आहेत, पण मोदी देशात कुठेही गेले तरी लाखभर लोक सहज त्यांना ऐकण्यासाठी जमतात. आजवर अनेकदा देशात “गरिबी हटाव’ची घोषणा झाली. पण गरिबी कधी हटली नाही.

फक्त कॉंग्रेसी नेत्यांचे शिष्यांचीच गरिबी हटली. परंतु आज मोदींच्या प्रत्येक योजनेमुळे खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे अवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व भाजयुमो कार्यकर्त्यांनी कसून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.