छोट्या एनबीएफसीचे प्रश्‍न वाढण्याची शक्‍यता 

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी इन्फ्रास्ट्रक्‍चर फायनान्शियल आणि कन्स्ट्रक्‍शन कंपनी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्‍चर फायनान्शियल लीजिंग सर्व्हिसेज मधील घडामोडीचा इतर क्षेत्रावरही परिणाम होत आहे. 1,500 लहान बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांचे परवाने नियामकाकडून रद्द होण्याची शक्‍यता आहे.
आता बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या नवीन अर्जांना मंजुरी देणे टाळण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. मागील शुक्रवारी एका निधी व्यवस्थापकाकडून दिवाण हाऊसिंग फायनान्सचे अल्पकालीन रोखे मोठ्या सवलतीवर विक्री करण्यात आले. यामुळे रोख रकमेच्या संकटाची समस्या वाढण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसांत अनेक बाबी समोर येत आहे, यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांची संख्या घटण्याची चिन्हे दिसत आहेत. काही कंपन्यांनी अल्प कालावधीसाठी कर्ज दिले होते, त्यांना आता अधिक निधीची दीर्घकाळासाठी गरज पडणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)