छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पिंपरी – पतीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. थेरगावातील बोराटेनगर येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी तिचा पती होरुन हसन शेख याच्यासह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्‍मा हारुन शेख (वय-35) असे आत्महत्या केले विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ अमजद शेख (वय-32, रा. पिंपळे गुरव) याने फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेश्‍मा हिचा 2003 मध्ये होरुन शेख याच्याशी विवाह झाला होता. पती होरुन तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून रेश्‍माने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. बाबर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)