छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे यांनी नेतृत्त्व करावे

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रवीण गायकवाड यांचे आवाहन

पुणे, दि. 25 – राजकीय नेत्यांवर विश्‍वास राहिला नसल्याने मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी नेतृत्व करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड आणि इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहेत. या त एक तरुणाने आत्महत्या, पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तर राज्य शासनाच्या आदेशावरुन आतापर्यंत 5 हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुळात मराठा समाज हा शांतताप्रिय मार्गाने जाणार, कायदा व सुव्यवस्था पाळणार आहे. आपल्या मागण्यांसाठी तो सनदशीरपणे आंदोलन करत आहे परंतू राज्य शासन मात्र हे आंदोलन दडपण्यासाठी दंडेलशाहीचा वापर करत आहे. राज्य शासनाची ही भूमिका योग्य नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात सहभागी तरुण आणि कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कुठलेही कृत्य करू नये. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामंजस्यांची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

आंदोलनाचे नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले यांनी करावे, ही भूमिका जाहीर करण्यापूर्वी आपण स्वत: त्यांना सातारा येथे भेटलो. त्यांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांच्याशीसुद्धा दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे गायकवाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)