“छत्रपती’च्या माजी संचालकांचा अपघाती मृत्यू

भवानीनगर- लोणंद येथे झाडाला गाडी धडकून झालेल्या अपघातात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दयाराम (बापू) जगन्नाथ सरक यांचा मृत्यू झाला.

लोणंद येथे कांदा विक्रीसाठी नेत असताना आज सकाळी 11 वाजता फलटण येथे स्वराज डेअरी समोर हा अपघात घडला. दयाराम सरक हे 2008 ते 2015 या कालावधी मध्ये छत्रपती कारखान्याच्या संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या अपघातमुळे कारखाना कार्यक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. श्री छत्रपती साखर कारखान्याचे विद्यमान संचालक रसिक सरक व तावशी गावचे सरपंच विक्रांत सरक यांचे ते चुलते होत.

Leave A Reply

Your email address will not be published.