छत्तीसगडमधील चकमकीत महिला नक्षलवादी ठार

रायपुर – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यत सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी काल रात्री ठार झाली. बुरकापल जंगल परिसरात सुरू झालेली ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती. परवाच सुरक्षा दलांच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत बिजापूर जिल्ह्यात आठ नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर सुकमा जिल्ह्यातील एका जंगल भागात ही मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती.

या जिल्हा पोलिसांची रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्कफोर्स, आणि रिसॉल्युट ऍक्‍शनच्या कमांडो बटालियन यांनी संयुक्तपणे ही मोहीम हाती घेतली होती. कारवाईचे हे ठिकाण रायपुर पासून चारशे किमी अंतरावर आहे. या कारवाईच्यावेळी जवानांवर प्रतिगोळीबार करून नक्षलवादी पळून गेले पण घटनास्थळी एक महिला नक्षलवादी ठार झाल्याचे दिसून आले असून त्या महिलेची ओळख अजून पटलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)