रायपुर – छत्तीसगडच्या बिजापुर जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. बिजापुर जिल्ह्याच्या इपेंता गावात ही चकमक झाली. त्यात छत्तीसगड पोलिसांसह तेलंगणाच्या पोलिसांनीही भाग घेतला. ज्या भागात ही चकमक झाली तो भाग तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमा भागात येतो. तेथील दाट जंगलात हे नक्षलवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे ही संयुक्त तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती त्यावेळी ही चकमक झाली.
मृतांमध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अजून ओळख पटलेली नाही. या आधी मार्च महिन्यात बिजापुर जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या अशाच एका संयुक्त मोहीमेत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0