छत्तीसगडमधील मंत्र्याच्या सीडीमागे पक्षातील सहकाऱ्यांचा हात

सीबीआयच्या आरोपपत्रात गौप्यस्फोट

नवी दिल्ली – छत्तीसगडमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते राजेश मुनात यांच्याशी संबंधित कथित “सेक्‍स सीडी’मागे भाजपमधीलच काही सदस्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट सीबीआयने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुनात यांचे पक्षातील सदहकारी कैलाश मुरारका यांच्याच सांगण्यावरून “पोर्न व्हिडीओ’मध्ये राजेश मुनात यांच्या चेहरा झळकवण्यात आल्याचे सीबीआयने आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. या कथित “सेक्‍स सीडी’संदर्भात सीबीआयने रायपूरच्या न्यायालयामध्ये सोमवारी आरोपपत्र दाखल केले. फॉरेन्सिक अहवालामध्ये मुनात यांच्याबाबतची ही सीडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे सीबीआयने आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

मुरारका सध्या फरार असून त्यांनी विनय पांड्या आणि रिंकू खनुजा या दोघांना 75 लाख रुपये देऊन मुंबईमध्ये ही सीडी तयार करवून घेतली होती, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. मुरारका यांचे नाव “मास्टर माईंड’ म्हणून सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये आल्यावर त्यांना पक्षातून तात्काळ काढून टाकण्यात आले आहे.

पंड्या आणि खनुजा यांनी मुंबईत ही सीडी बनवून घेतली. त्यासाठी त्यांनी संबंधित व्यक्‍तीला एक लाख रुपये दिले होते. कथित लैंगिक संबंधांचा व्हिडीओ पत्रकार विनोद वर्मा यांना गाझियाबाद येथे घरीच देण्यात आला. वर्मा आणि मुरारका यांनी मिळून छत्तीसगड कॉंग्रेस प्रमुख भुपेश भागेल आणि त्यांच्या सहज्काऱ्यांना दिल्लीत भेटले होते, असेही सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणातील रिंकी खानुजा या स्थानिक उद्योजकाने तपास सुरु असताना आत्महत्या केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)