छत्तिसगढ कॉंग्रेसचे अध्यक्ष बाघेल यांची तुरूंगात रवानगी

रायपूर – छत्तिसगढमध्ये राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या सेक्‍स सीडी प्रकरणाच्या संदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांना सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली.

मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये छत्तिसगढचे मंत्री राजेश मुनात यांची एक वादग्रस्त सीडी समोर आली. ती सीडी बनावट असल्याचा आरोप मुनात यांनी केला. बाघेल आणि इतरांनी ती सीडी सर्क्‍युलेट केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून बाघेल, पत्रकार विनोद वर्मा, व्यावसायिक विजय भाटिया यांच्यासह पाच जणांविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर बाजू मांडण्यास वकील देण्यास किंवा जामीन अर्ज सादर करण्यास बाघेल यांनी नकार दर्शवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, संबंधित प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले. भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आपण तुरूंगात सत्याग्रह करू, अशी भूमिका बाघेल यांनी मांडली. बनावट सीडीद्वारे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुनात यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर या प्रकरणी छत्तिसगढमधील भाजप सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली. आता बाघेल यांची तुरूंगात रवानगी झाल्याने राजकारण आणखी तापण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)