छत्तिसगढमधील मोहिमेत 15 नक्षलवाद्यांना अटक

संग्रहित छायाचित्र.

रायपूर – महाराष्ट्राबरोबरच छत्तिसगढमध्येही सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. छत्तिसगढमध्ये आज दोन घटनांमध्ये 15 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. नक्षलग्रस्त सुकमा आणि नारायणपूर जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) छत्तिसगढमधील नक्षलवादविरोधी मोहिमेला आणखी बळ देण्याच्या उद्देशाने नवी रणनीती आखली आहे. त्याअंतर्गत 45 ते 50 वयोगटातील जवानांना बदलले जाणार आहे.

त्यांची जागा दलात नव्याने भरती झालेले 18 ते 21 वयोगटातील जवान घेतील. मागील काही दिवसांत नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये शहीद झालेल्यांत अधिक वयाच्या जवानांचा समावेश आहे. त्याचा विचार करून सीआरपीएफने नवी रणनीती आखल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)