चौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय

सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहोल दिसतोय. निवडणूकांच्या धामधूमीतही क्रिकेटप्रेमी घरबसल्या आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेताहेत. त्यानंतर काही दिवसात विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळेच त्यात रंगून जाताना दिसणार आहे. त्यातही बच्चेकंपनीचा आनंद काही औरच!!

मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा त्यापासून दूर नाहीये. क्रिकेटच्या विषयावर आधारलेला ‘बाळा’ हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. क्रिकेटला आपलं सर्वस्व मानणाऱ्या एका चिमुरड्याची गोष्ट ‘बाळा’ या आगामी चित्रपटातून पहायला मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित झाली आहे. ‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. येत्या ३ मे ला ‘बाळा’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.