चोरीप्रकरणी चौघांना अटक

पिंपरी – दुकान फोडून दुकानातील एक लाख 82 हजार रुपयाचे कॉपर ब्रास ऍल्युमिनियमचे 406 किलो वजनाचे बार चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना तळवडे रस्ता, निगडी येथे घडली.

रफिक उमर जमादार, करण कुमार जाधव, निलेश सुनील पवार, सुनील अंकुश देवकते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. हिरामण कान्होजी चौधरी (वय-34, रा. लक्ष्मी हार्डवेअर, ज्योतिबानगर, तळवडे) यांनी मंगळवारी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, 4 ते 5 एप्रिल ला आरोपींनी संगनमत करुन अंबिका मेंटल, तळवडे रस्ता येथील दुकानाचे शटर उचकटून ही चोरी केली. वाहनचोर विरोधी पथकाने या चोरट्यांना अटक केल्यावर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)