चोरटयांनी मुळा नदीच्या पात्रातील फ्लड सेंन्सर चोरले

चोरटयांनी मुळा नदीच्या पात्रातील फ्लड सेंन्सर चोरले
पुणे,दि.13- मुळा नदीच्या पात्रात विश्रांतवाडी ते खडकी टॅंक रस्त्याला जोडणाऱ्या पुलावर लावण्यात आलेले फ्लड सेंन्सर चोरण्यात आले. हा प्रकार सात ते आठ नोव्हेंबर दरम्यान घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल भालेराव(26,रा.सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे एका खासगी कंपनीत फिल्ड टेक्‍निशिअन पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीमार्फत पुणे शहरातील पुर प्रभावीत क्षेत्रातील नदीच्या पुलावर फ्लड सेंन्सर बसविण्याचे काम करण्यात आले आहे. कंपनीने मुळा नदीच्या पात्रात विश्रांतवाडी ते खडकी टॅंक रस्त्याला जोडणाऱ्या पुलावर फ्लड सेंन्सर बसवले होते. हे बॉस्च कंपनीचे सुमारे 87 हजार 585 रुपयांचे सेंन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार श्रीकांत नांदणीकर करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)