चोक्‍सीला ताब्यात घेण्याची भारताची ऍन्टिग्वाला विनंती

नवी दिल्ली – ओअंजाब नॅशनल बॅंकेतेतील गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याला ताब्यात घ्यावे अशी विनंती भारताच्यावतीने ऍन्टिग्वा आणि बार्बुडाच्या प्रशासनाला करण्यात आली आहे. चोक्‍सी हा कॅरिबियन बेटावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्याबाबत भारताकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. जमिनीवरुन, हवाई मार्गे किंवा जलमार्गे चोक्‍सीच्या प्रवासावर निर्बंधे आणावीत, अशी विनंती भारताने केली आहे.

चोक्‍सी ऍन्टिग्वामध्ये असल्याचे समजल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने जॉर्जटाऊनमधील उच्चायुक्‍तालयाच्या माध्यमातून ऍन्टिवा आणि बार्बडाच्या प्रशासनाला सतर्क केले आहे. आपण गेल्यावर्षी उद्योगवाढीसाठी ऍन्टिग्वाचे नागरिकत्व घेतल्याचा दावा चोक्‍सीने गेल्या आठवड्यात केला. ऍन्टिग्वाच्या पासपोर्टच्या आधारे त्याला 132 देशांमध्ये प्रवासही करता येणार आहे. त्याच्या प्रवासावर निर्बंध तसेच त्याला ताब्यात घेण्याबाबत ऍन्टिग्वा आणि बार्बडाच्या प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चोक्‍सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीबाबत अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआय तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)