“चेनानी-नाशरी’ बोगद्याला श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव : गडकरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील रामबनजवळ असलेल्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 2017 मध्ये झाले होते. या बोगद्याच्या निर्मिती कार्याची सुरूवात 23 मे 2011 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती.

2017 मध्ये याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता. तब्बल 1 हजार 200 मीटर उंचीवर व साधारण 9.02 किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर 40 किलोमीटरने कमी झाले आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.